एका शहरातील एका मोठ्या पंचतारांकित हॉटेलमध्ये एक हाय प्रोफाइल लाईफ कोच कंपनीच्या एम्प्लॉइजना आयुष्यात परिवाराचे आणि आईचे महत्त्व समजावून सांगत होता. प्रत्येकाबद्दल कृतज्ञता व्यक्त करा आणि स्वतः मध्ये सकारात्मक बदल घडवा वगैरे वगैरे....
मात्र त्याचा फोन खणखणला की तो डिस्टर्ब व्हायचा. लंच ब्रेक मध्ये आयोजक आणि इतरांसोबत गप्पा मारताना त्याचा फोन पुन्हा वाजला. आता मात्र त्याने चिडूनच दबक्या आवाजात फोन उचलला, "काय चाललंय आई तुझं? माझी महत्वाची मिटींग सुरू आहे. बोल पटपट!"
"काही नाही रे बाळा! आज मदर्स डे म्हणून मी तुझ्या फोनची वाट बघत होते एवढंच!"
- श्वेता चिमोटे

No comments:
Post a Comment